Therapy साठी येणाऱ्या पालकांसाठी FAQ
आपल्या मनातील सामान्य प्रश्नांची सोपी उत्तरे
❓ थेरपीसाठी येण्यापूर्वी मुलाने काय खावे? +
✅ थेरपीच्या 45–60 मिनिटे आधी हलके व पौष्टिक अन्न द्यावे.
योग्य पर्याय:
- फळ (सफरचंद / पपई)
- पातळ डाळीचं सूप
- पोहे / उपमा (थोड्या प्रमाणात)
- दही (जर पचन चालत असेल)
❌ टाळावे: जड, तिखट, तळलेले पदार्थ, जास्त साखर, जंक फूड
❓ रिकाम्या पोटी थेरपीसाठी आणू शकतो का? +
❌ नाही. रिकाम्या पोटी मूल चिडचिड करतं, लक्ष देत नाही आणि लवकर थकतं. 👉 थोडं तरी खाऊन आणणं आवश्यक आहे.
❓ थेरपीच्या अगदी आधी दूध द्यावं का? +
⚠️ शक्यतो नाही. काही मुलांमध्ये दूध जड जातं किंवा पचनाचा त्रास होतो. 👉 दूध थेरपीनंतर द्यावं.
❓ थेरपीच्या आधी मोबाईल / टीव्ही चालेल का? +
❌ नाही. Screen Time मुळे मूल over-stimulated होतं आणि focus कमी होतो. 👉 किमान 1 तास आधी screen बंद ठेवा.
❓ थेरपी किती वेळाची असते? +
✅ साधारणतः 30 ते 45 मिनिटे, मुलाच्या गरजेनुसार.
❓ किती दिवसांत फरक दिसतो? +
📌 प्रत्येक मूल वेगळं असतं. साधारणतः 4–6 आठवड्यांत छोटे बदल आणि 3–6 महिन्यांत ठळक प्रगती.
❓ थेरपी अचानक बंद केल्यास काय होईल? +
🔴 प्रगती थांबू शकते किंवा मागे जाण्याची शक्यता असते. 👉 Step-wise plan नुसारच बदल करावेत.
❓ थेरपी फक्त centre मध्ये पुरेशी आहे का? +
❌ नाही. थेरपी = Centre + Home + Parent involvement
❓ पालकांनी काय लक्षात ठेवावे? +
🌱 धीर ठेवा
🌱 तुलना टाळा
🌱 छोट्या प्रगतीचा आनंद घ्या
Therapy & Autism – Parent FAQ (Part 2)
थेरपी दरम्यान पालकांना पडणारे अजून काही महत्त्वाचे प्रश्न
❓ थेरपीच्या दिवशी मुलाला ताप / सर्दी असेल तर आणावं का? +
❌ शक्यतो नाही. आजारी असताना मूल थकलेलं असतं आणि थेरपीमध्ये सहभागी होत नाही. 👉 पूर्ण बरे झाल्यावरच आणावं.
❓ थेरपीसाठी येताना मुलाने झोप पूर्ण केलेली असावी का? +
✅ होय. अपुरी झोप असल्यास चिडचिड वाढते आणि लक्ष लागत नाही. 👉 थेरपीच्या आधी पुरेशी झोप खूप महत्त्वाची आहे.
❓ थेरपीच्या दिवशी जास्त खाऊ दिल्यास चालेल का? +
❌ नाही. जास्त खाल्ल्याने आळस येतो आणि उलटी / पोटदुखी होऊ शकते. 👉 Moderate आणि light diet योग्य.
❓ थेरपीच्या वेळी मूल रडल्यास थेरपी थांबवली जाते का? +
🔹 नाही. थोडं रडणं हा बदल स्वीकारण्याचा भाग असतो. 👉 Therapist मुलाला regulate करून थेरपी चालू ठेवतो.
❓ थेरपी सुरू केल्यावर लगेच बोलायला लागेल का? +
⚠️ नाही. Speech development ही step-by-step प्रक्रिया आहे. 👉 आधी Eye contact, Understanding, Imitation आणि नंतर
speech येतो.
❓ थेरपी चालू असताना शाळा चालू ठेवावी का? +
✅ होय (जर मूल तयार असेल तर). थेरपी + शाळा social exposure वाढवते. 👉 Special educator च्या मार्गदर्शनाखाली
निर्णय
घ्यावा.
❓ थेरपी किती वर्षे लागते? +
📌 निश्चित कालावधी नसतो. थेरपी मुलाच्या गरजेवर, consistency वर आणि home practice वर अवलंबून असते.
❓ घरातील इतर लोकांनी काय काळजी घ्यावी? +
✅ एकसारखे नियम पाळावेत, मुलाशी शांतपणे बोलावं, ❌ ओरड व मार टाळावा. 👉 Consistency फार महत्त्वाची आहे.
❓ थेरपी दरम्यान मोबाईल पूर्ण बंद करावा लागतो का? +
✅ होय. मोबाईल attention divert करतो आणि therapy goals मध्ये अडथळा आणतो.
❓ थेरपी चालू असताना diet supplement द्यावे का? +
⚠️ RCI Certified Therapist / Doctor च्या सल्ल्याशिवाय नाही.
❓ प्रत्येक therapy रोज आवश्यक आहे का? +
❌ नाही. Therapy plan मुलाच्या assessment नुसार ठरतो. 👉 Quality > Quantity
❓ मुलगा/मुलगी इतर मुलांसारखा होईल का? +
👉 प्रत्येक मुलाची प्रगती वेगळी असते. थेरपीचा उद्देश Independence, Communication आणि Functional skills आहे.
❓ पालकांनी काय अपेक्षा ठेवाव्यात? +
🌱 Realistic expectations
🌱 Patience
🌱 Regular follow-up
👩⚕️ Mrs. Laxmi Mahesh Kamble
RCI Certified Special Educator
B.A., D.H.L.S., Special Education (HI, ID)
Founder – Let’s Talk Child Development Center
15+ Years of Experience
📍 Ravet | 📍 Talegaon
At Let's Talk Child Development Center, we nurture every child’s potential through expert therapy,
personalized education plans, and a compassionate approach to growth and learning.
Get In Touch
Address
Pimpri Chinchwad Ravet Shindewasti MIDC Road krushani impirio building opposite...
412101
Email
support@letstalkcenter.com
MAP